Saturday, May 18, 2013

Lokmat Marathi News : Satara-Main

Lokmat Marathi News : Satara-Main (सातारा-मुख्य)
492 जुने सिमेंट बंधारे पुनरुज्जीवित करणार
सातारा। दि. 17 (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दुष्काळ निवारणाचा एक भाग म्हणून आगामी काळात 2 हजार 6क् साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामुळे नदीपात्र तसेच ओढय़ांमध्ये पाणी अडून राहणार आहे. दरम्यान, जिल्हय़ात जुने सिंमेट बंधारे शोधून त्यांचे पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 492 सिमेंट बंधारे हाती घेतले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी 283 सिमेंट बंधारे पूर्ण करण्यात येणार असून यासाठी 23.73 कोटी खर्च येणार आहेत. यापैकी 210 बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात खासदार, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 7.25 कोटी रुपये उपलब्ध झाले असून यातून 73 बंधा:यांची कामे सुरू आहेत. कराड तालुक्यातील बंधा:यांच्या कामांसाठी 16 कोटी मंजूर झाले असून यातून 162 बंधारे होणार आहेत.
जिल्ह्यातील जुन्या 35 बंधा:यांची दुरुस्ती हाती घेतली असून नाला सरळीकरण आणि खोलीकरणातून 62 कामे सुरू आहेत. टंचाई निवारणाच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना आराखडय़ातून 3क् कोटी जलसंधारणासाठी राखून ठेवले अहेत. एकात्मिक पाणलोट विकासातून 3क्क् बंधारे बांधण्याचे नियोजन आहे.
याबरोबरच 1972 च्या दुष्काळातील 35 पाझर तलावांची जलरोधच्या माध्यमातून गळती काढण्याचे काम सुरू आहे. पाझर तलावातील गाळ काढण्याचे तसेच कोल्हापूरी बंधा:यांच्या दुरुस्तीचे कामही शासनाने लोकसभागातून हाती घेतले आहे.
Read More »

करेंगे या मरेंगे.., कोयना विस्थापित 'क्रांतिदिनी' करणार 'शिवसागर'मध्ये 'निर्धार आंदोलन'
कोयनानगर। दि. 13 (वार्ताहर)
'कोयना प्रकल्पाला पन्नास पूर्ण झाली तरी येथील प्रकल्पग्रस्त नरकयातना सहन कराव्या लागत असून अजूनही 4क् टक्के पुनवर्सन बाकी आहे. सरकारने तातडीने कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवून त्यांचे विकसनशील पुनवर्सन न केल्यास 9 ऑगस्टला 'क्रांतिदिनी' कोयनेच्या शिवसागर जलाशयात 'करेंगे या मरेंगे'चा निर्धार करून आंदोलन करणार आहे,' असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी कोयनानगर येथे दिला.
'कोयना'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून श्रमिक मुक्ती दलाने आयोजित केलेल्या धरणग्रस्तांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सर्व धरणग्रस्तांनी कोयना नदीपात्रत उतरून कोयनामाईच्या पाण्याची शपथ घेऊन 'करेंगे या मरेंगे'चा निर्धार व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत पन्हाळकर, जगन्नाथ विभुते, संजय बड, अशोक पाटील, अजरुन संकपाळ, सीताराम जंगम तसेच धरणग्रस्त उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, 'कोयना प्रकल्पाचा सुवर्ण महोत्सव भांडवलदारांचा तर कोयनापुत्रंचा मरणोत्सव आहे. 9क्69 कुटुंबांपैकी 6919 कुटुंबांचे सरकारने रडतखडत पुनर्वसन कसेबसे केले आहे. 2752 कुटुंबे अद्याप पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असल्याची कबुलीच कोयना प्रकल्पाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या 124 अधिकृत तर 19 अनधिकृत वसाहती आहेत. शासनाने पुनर्वसन रखडवून अन्याय केला आहे.'
Read More »

चोरटय़ांचा धुडगूस सुरूच, क:हाडात पाच दुकाने फोडली;11 हजारांची रोकड लंपास
क:हाड। दि. 17 (प्रतिनिधी)
शहर परिसरात चोरटय़ांचा धुडगूस सुरूच असून शुक्रवारी पहाटे शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दुकानांना त्यांनी लक्ष्य बनविले. चोरटय़ांनी एकूण 5 दुकाने फोडली. एका दुकानातील 11 हजारांचे साहित्य लंपास करण्यात आले तर इतर चार दुकानांत ऐवज हाती न लागल्याने चोरटे पसार झाले.
गेल्या काही दिवसांपासून क:हाड, मलकापूर व आगाशिवनगर परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ सुरू आहे. कारमधील सीडी प्लेअर, म्युङिाक सिस्टीम, घरफोडी करून दागिने चोरणो असे प्रकार सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी आगाशिवनगर येथील शिक्षकाचे घर फोडून चोरटय़ांनी 9 तोळ्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे चोरटय़ांनी क:हाड शहरातील मुख्य बाजारपेठेकडे आपला मोर्चा वळविला. बाजारपेठेतील आझाद चौक परिसरात असणारे प्रसाद कॉम्प्युटर्स नावाचे दुकान फोडण्यात आले. कुलूप तोडून चोरटे दुकानामध्ये शिरले. दुकानातील साहित्य विस्कटून 11 हजार 5क्क् रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली. त्यानंतर प्रसाद कॉम्प्युटर्स दुकानाच्या शेजारी असणारी मानकर फ्लॉवर र्मचट, महाराज फूटवेअर, सिटी किंग कस्टम अॅण्ड इलेक्ट्रिकल, राजेंद्र प्रोव्हिजन स्टोअर्स ही दुकानेही चोरटय़ांनी फोडली; मात्र त्याठिकाणी किंमती ऐवज अथवा रोकड मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तेथून पोबारा केला.
आज सकाळी घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत ठाकूर, तृप्ती देशमुख यांच्यासह सहायक फौजदार चांगदेव आगवणो, सज्जन जगताप, शशिकांत काळे, कुलदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबतची फिर्याद प्रसाद कॉम्प्युटर्स दुकानाचे मालक प्रसाद प्रकाश पोटे (रा. शुक्रवार पेठ, क:हाड) यांनी दिली आहे.
Read More »

लोकसहभागातून दुष्काळ निवारण शक्य, बाळासाहेब थोरात यांचे मत; रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या उपक्रमाचे कौतुक
फलटण। दि. 17 (प्रतिनिधी)
'राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीत स्वत:च्या मतदार संघाचा, जिल्ह्याचा विचार न करता राज्यातील तीव्र दुष्काळी भागातील गावांना एक हजार टाक्या व बोर मारून देण्याचा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उपक्रम माणुसकी जपणारा असून शासन दुष्काळ निवारण करीत असताना व्यक्ती, सामाजिक संस्था व लोक सहभागातून मदत झाल्यास दुष्काळाचे निवारण लवकर होणार आहे,' प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी त्यांनी मागेल त्या गावाला पाणी, रोजगार व छावणी देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
गिरवी, ता. फलटण येथे स्वराज्य उद्योग समूह, फलटण तालुका काँग्रेस, दिगंबर आगवणो मित्र मंडळ यांच्यावतीने राज्यातील दुष्काळग्रस्त गावांना पाठविण्यात येणा:या सिंटेकच्या एक हजार टाक्यांचे वाटप थोरात व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. चिमणराव कदम होते. यावेळी माणचे आ. जयकुमार गोरे, माजी खा. व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी आ. शहाजीराव पाटील, जिल्हाधिकारी एन. रामास्वामी, न्यू फलटण शुगर वर्क्‍स लि., साखरवाडीचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील, ज्येष्ठ नेते सुभाषराव बेडके, पं. स. सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणो, नगरसेवक अनुप शहा आदी उपस्थित होते.
राज्यात मागील दोन वर्षापासून कमी पावसामुळे भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्यशासन दिवसरात्र दुष्काळ निवारण करण्यात मग्न आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळावर चर्चा होत असून दुष्काळ निवारण्याच्या ेकामाला जनतेची व विविध सामाजिक संस्थांची साथ मिळणो गरजेचे आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकरसारख्या धाडसी तरुणाने दुष्काळी जनतेचे आश्रू पुसण्यासाठी सर्वार्थाने कोणताही स्वार्थ न ठेवता एक हजार टाक्या व बोर मारून देण्याचा घेतलेला निर्णय राज्याला आदर्शवतच आहे. या धाडसाचे आपल्याला कौतुक वाटत असून दुष्काळी पाश्र्वभूमीवर प्रत्येकाला रोजगार, पाणी व मागेल त्या गावाला छावणी देण्याची राज्यशासनाची भूमिका आहे. यामध्ये अधिकारी वर्गाने कमी पडू नये. दुष्काळी जनतेने शासनावर विश्वास ठेवावा, आम्ही दिवस-रात्र तुमच्यासाठीच झटत आहोत, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दि. 18 रोजी सांगोला येथे 3क्क् पाण्याच्या टाक्याचे वाटप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात कूपनलिका काढून देणार असल्याचे सांगत तालुक्यात राबवलेले पाटबंधारे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली.
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयकुमार ¨शदे यांनी आभार मानले.
Read More »No comments:

Post a Comment

Followers